नक्कीच होतील स्वप्ने खरी...

काल वाटेत भेटली
इवलुशी एक मुंगी
मला हँलो म्हणायची
नाही घेतली तिने तसदी
...

मीच तिला मग
अडवले जबरदस्ती,
म्हटले एव्हडी काय
ग तुला कामाची घाई?

उत्तर तिचे ऐकुन
मजा मला वाटली,
म्हणे काम केल्याशिवाय
कस निभायचे बाई?

रस्ता तिचा अडवल्यावर
वेगळी वाट तिने शोधली,
जातांना मात्र माझ्याकडे
बघुन खुदकन हसली

वाटते क्षुद्र तुम्हाला
मुंग्यांचे जीवन जरी,
त्याच्यातच सामावलीये
आयुष्याची 'Philosophy' सारी

रस्त्यात अपुल्या अडथळे
कित्येक दिसले तरी,
शोधत रहा मार्ग आणखी
नक्कीच होतील स्वप्ने खरी...

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Popular Posts

 
© E- Fun & Joy | Blogger Blog Templates |