शिक्षक : वर्गात जो टाइमपास करायला येत असेल, त्याने उभं राहावं!
खूप वेळ कोणीच उभे राहात नाही... शेवटी गंपू उभा राहतो.
शिक्षक : काय रे, तू वर्गात टाइमपास करायला येतोस का?
गंपू : नाही सर! पण तुम्ही एकटेच उभे होतात, ते बरं नाही वाटलं!!
***********************************************************************************
पाहुणे : अरे वा, तुमच्याकडे पुस्तकांचं चांगलं कलेक्शन आहे! आता त्याच्यासाठी एक चांगलंसं कपाट पण घ्या!
यजमान : अहो कपाट कोणी उसनं देत नाही!
***********************************************************************************
हुशार पत्नी ची व्याख्या : अशी व्यक्ती जी एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करते की, नवऱ्याला दुसरी बाई परवडूच नये!
***********************************************************************************
पार्टी ऐन रंगात आलेली असते. गंपू एका खुर्चीत बसून बघत असतो. तेवढ्यात डान्सफ्लोअरवरची एक सुंदर मुलगी त्याच्याकडे येऊन विचारते, काय डान्स करणार का?
गंपू : हो!
मुलगी : ठीक आहे, मग तुझी खुर्ची मला दे!!
***********************************************************************************
एका बँकेत काही दरोडेखोर शिरतात . एक दरोडेखोर पिस्तुल
दाखवून एका माणसाला विचारतो , ' काय रे , तू मला दरोडा घालताना बघितलंस का ?'
तो माणूस म्हणतो , ' हो !' दरोडेखोर त्याच्यावर गोळी झाडतो . पुढे एक जोडपं उभं असतं . त्यांनाही तेच विचारतो , ' तुम्ही मला पाहिलंत का ?' नवरा तत्परतेने उत्तरतो , ' मी नाही ... पण माझ्या बायकोने पाहिलं !'
0 comments:
Post a Comment